पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जि.मा.का.) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबीराचे शनिवार दि. 6 मे रोजी श्री. इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय हॉल ओरोस फाटा, आर.टी.ओ ऑफीस जवळ ओरोस येथे सकाळी 9. 30 वाजता सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. प्रमुख उपस्थिती लोकसभा सदस्य विनायक राऊत, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे, विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, विधान सभा सदस्य नितेश राणे, विधान सभा सदस्य वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, ओरोस ग्रामपंचायतीचे सरपंच आशा मुरमुरे आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. अशी माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा औ.प्र.संस्थाचे प्राचार्य ए.एस. मोहारे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी दिली .
Comments
Post a Comment