जिल्ह्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीरांचे 23 ते 26 मे कालावधीत आयोजन - प्र.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.जी काटकर

सिंधुदुर्गनगरी,दि.19 (जि.मा.का.) : शासन आपल्या दारी अभियानातंर्गंत जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर दि. 23 ते 26 मे 2023 या कालावधीत प्रत्येक तालुक्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर’ आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्र.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.जी काटकर यांनी दिली आहे. या शिबीरात जिल्हा स्तरावरील तसेच तालुकास्तरावरील सर्व प्रशासकीय विभाग सहभागी होणार असून समस्याग्रस्त महिलांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करणे हा या शिबीरांचा मुख्य उद्देश आहे. दि. 23 मे 2023 रोजी छत्रपती शिवाजी चौकाजवळ, मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली तर तहसीलदार कार्यालय कुडाळ व वेंगुर्ला येथे होणार आहेत. तसेच दि. 24 मे 2023 रोजी वैभववाडी तहसीलदार कार्यालय आणि दि. 25 मे 2023 रोजी देवगड व दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे होणार आहेत. दि. 26 मे 2023 रोजी समर्थ हॉल कोळंब, मालवण व आर.पी.डी. हायस्कूल सावंतवाडी येथे शिबीरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिबीराच्या ठिकाणी तात्काळ तक्रार निवारण तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व सेवा उपस्थित महिलांना पुरविण्यात येणार असून याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी संबंधीत तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी अथवा तहसीलदार कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्र. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.जी.काटकर यांनी केले आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने मलिांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून महिला व बालविकास विभागामार्फत महिला लोकशाही दिन राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर राबविण्यात येतो. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'