जलधी क्षेत्रात 1 जून ते 31 जुलै कालावधीत मासेमारीस बंदी - सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय अधिकारी श्री.स अलगिरी

सिंधुदुर्गनगरी दि.16 (जि.मा.का): महाराष्ट्र सागरी मासेवारी नियमन अधिनियम- 1981 अंतर्गत राज्याच्या जलधी क्षेत्रात (12 सागरी मैल पर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांस मासेमारी बंदी कालावधी दि. 1 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस 61 दिवस) पर्यंत कालावधीसाठी यांत्रिकी मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री.स अलगिरी यांनी केले आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन लवकर होत असल्याने या किनारपटीवर मासेमारी बंदी कालावधी 15 एप्रिल 2023 ते 14 जुन 2023 (दोन्ही दिवस धरून) तसेच पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन उशीरा होत असल्याने पश्चिम किनार पट्टीवर मासेमारी बंदी कालावधी 1 जुन 2023 ते 31 जुलै 2023 (दोन्ही दिवस धरुन) या कालावधीत विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) पावसाळी मासेमारी बंदी घोषीत केलेली असल्याचे केंद्र शासनामार्फत कळविण्यात आलेले आहे. मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांची जिवीत व वित्त यांचे रक्षण करण्याच्या हेतुने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन व रचना केलेल्या सल्लागार समितीशी विचार विनिमय करण्यात आला आहे. शासन आदेश दि. 1 जुन 2015 अन्वये 1 जुन ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरून) राज्याच्या जलधी क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी कालावधीचे नियमन करण्यात आले आहेत. सदरच्या आदेशान्वये परवानाधारक बिगर-यंत्रचालित नौकास मासेमारीची मुभा दिलेली आहे. या कालावधीत मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बिजनिर्मीती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब/वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जिवीत व वित्त हानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. सदर पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. सदर पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचालित नौकांना लागू राहणार नाही. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका दि.1 जुन 2023 पुर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे. तसेच दि. 31 जुलै 2023 वा त्यापुर्वी समुद्रात मासेमारीकरीता जाता येणार नाही, याची नोंद घ्यावी. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासुन 12 सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण, मार्गदर्शक सुचना / आदेश लागू राहतील. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासुन 12 सागरी मैलापर्यंत यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी फालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास, केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), 2019 च्या कलम 14 अन्वये नोका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी मासळी जप्त करण्यात येईल तसेच कलम 17 मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल. पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना यंत्रलित व यांत्रिक मासेमारी नोकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. पावसाळी बंदी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकास अवागमन निपिध्द आहे. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत ) पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेने बेकायदेशीर मासेमारी न करण्याबाबत आपले अधिनस्त सर्व मच्छीमार सहकरी संस्थास अवगत करावे तसेच बंदी कालावधीत आपल्या कार्यक्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेने बेकायदेशीर मासेमारी केली जाणार नाही. पावसाळी मासेमारीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'