शिष्यवृत्ती नवीन अर्ज नोंदणी, जुन्या अर्जाचे नूतनीकरणासाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. 3 (जि.मा.का.): भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी सन 2022-23 करीता महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज अद्याप नोंदणी झालेली नाहीत, अशा अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करणे तसेच महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज मंजुरीस पाठविण्यासाठी दि. 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रीया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadhtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहे. विद्यार्थ्यानी वेळत अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जाची छाननी करून परिपूर्ण अर्ज मंजुरीस्तव या कार्यालयाकडे वर्ग करण्याबाबत संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य यांनी दि. 31 मे अखेर कार्यवाही करावी. ज्या विद्याथ्यांचे अर्ज अद्याप नोंदणी झालेली नाहीत. अशा विद्यार्थ्याचे अर्ज संबंधित महाविद्यालयांनी नोंदणी करून मंजुरीसाठी पाठविण्यात यावे, शिष्यवृत्ती अर्ज भरणे व मंजुरीसाठी पाठविण्याची दि. 31 मे ही अंतिम मुदत असल्याने या योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जवाबदार राहतील असे पत्रकात नमूद आहे. शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्ज नूतनीकरण करणेबाबत समस्या उद्भवल्यास अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय (दूरध्वनी क्र. 02362-228882) येथे संपर्क साधावा, असे आवाहन ही समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. चिकणे यांनी केलेले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'