युवाश्क्ती करिअर मार्गदर्शन शिबीराचे 6 मे रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जि.मा.का.) : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शिबीर दिनांक 6 मे 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता श्री. इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय हॉल, ओरोस फाटा, सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकानी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे. या शिबीराचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रमासाठी जिल्हयातील दहावी बारावी परिक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह उपस्थित रहावे. विविध विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'