तलाठी पदभरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष

सिंधुदुर्गनगरी,दि.31 (जि.मा.का.) : जिल्‍हाधिकारी कार्यालय यांच्‍या आस्‍थापनेवरील तलाठी पदभरतीसाठी अर्ज केलेल्‍या उमेदवारांच्‍या अडी अडचणी दूर करण्‍यासाठी आणि त्‍यांना मार्गदर्शन करण्‍याकरिता जिल्‍हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष (हेल्‍प डेस्‍क) 02362-228845 स्‍थापन करण्‍यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने महसूल व वन विभाग यांच्याकडील पत्रानुसार तलाठी (गट-क) संवर्गाची सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबवून संपूर्ण भरती प्रक्रीया पार पाडण्यासाठी शासन स्तरावरुन जाहिरात प्रसिध्दी देण्यात येणार असून, तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडी अडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता विभागस्तरावर व जिल्हास्तरावर मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यातबाबत अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक,भूमी अभिलेख पुणे यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'