स्मार्ट अंतर्गत स्थापित महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकाची जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न

सिंधुदुर्गनगरी दि.12 (जि.मा.का): जिल्ह्यातील स्मार्ट अंतर्गत स्थापित महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकाची जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणासाठी एकूण 11 कंपनीचे 48 संचालक, उमेद व माविमचे जिल्हा,तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळचे जिल्हा समन्वयक अधिकारी नितीन काळे, DCO, MAVIM यांनी संचालकांना स्वयंशिस्त, आर्थिक व्यवहार, नियोजन व शेतकरी उत्पादक कंपनी व संस्था यातील फरक याबद्दल मार्गदर्शन केले. संचालकांना पुढील कार्यवाही साठी शुभेच्छा दिल्या. योगेश लोणकर, Agribusiness and Management Expert, बेसिक्स लि. यांनी स्मार्ट प्रकल्पाची ओळख व उपप्रकल्प अंमलबजावणी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये काम करताना संचालकांना अंगीकारावयाच्या गोष्टींविषयी मार्गदर्शन केले. तसेच सभासद नोंदणी, स्मार्ट प्राथमिक मंजूरीचे प्रस्ताव, पुर्ण प्रकल्प प्रस्ताव याबद्दल चर्चा केली. अभिजीत परब, DTM, BASICS Ltd. व वैभव पवार, DMM, MSRLM यांनी शेतकरी उत्पादक कंपनीचे उद्देश, फायदे. MOA व AOA याविषयी मार्गदर्शन केले. नितीन जावळे DM-Con./Ent.MSRLM यांनी संचालक, CEO व सभासद यांचे कर्तव्य व जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. स्मार्ट जिल्हा अंमलबजावणी कक्षाच्या UCDS expert M. A. Mutke यांनी स्मार्ट प्रकल्पाविषयी तर देविदास देसाई District Co-ordinator ATMA यांनी शेतकरी उत्पादक कंपनीसाठी अन्य योजनांविषयी मार्गदर्शन केले. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'