माविमच्यां माध्यमातुन कायदे विषय सल्ला शिबिर व जेंडर व न्युट्रीशन बैठक सावंतवाडी येथे संपन्न

सिंधुदुर्गनगरी,दि.18 (जि.मा.का.) : महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित माहेर लोक संचलित साधन केंद्र अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प (नव तेजस्विनी ) या योजेअंतर्गत कायदे विषय सल्ला शिबिर व जेंडर व न्युट्रीशन या घटकांपर्यंत तालुकास्तरीय पोलिस आणि माविम मित्र मंडळ संयुक्त बैठक पत्रकार हॉल नगरपरिषद सावंतवाडी येथे संपन्न झाली. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळचे जिल्हा समन्वयक नितिन काळे, ICDS प्रकल्प अधिकारी श्रीमती मोरे, अभय केंद्र, पंचायत समितीच्या सहाय्यक संरक्षण अधिकारी श्वेता बगळे, दिवाणी न्यायालय वकील पूजा जाधव, maa. विजय पवार, श्रीम. रश्मी मसुरकर, पोलीस विभागाच्या ठाकूर, देसाई व त्यांच्या सहकारी, महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक श्रीमती अर्पिता वाटवे, पुरुष मास्टर ट्रेनर उत्तम मेस्त्री, संजय मेस्त्री, अनिल राऊल, नंदकिशोर झारापकर, माहेर लोक संचलित साधन केंद्राच्या अध्यक्ष श्रीमती नम्रता झारापकर, माहेर लोक संचलित साधन केंद्राच्या कोषाध्यक्ष श्रीमती. भक्ती दळवी, कायदासाथी श्रीमती अर्चना बागवे, माहेर CMRC च्या RGB सभासद, CRP तसेच सर्व स्टाफ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर इतनी शक्ती हमे दे न दाता माविम प्रार्थना घेण्यात आली. जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक केली. समुपदेशन केंद्राच्या वाटवे यांनी कौटुंबिक हिंसाचार यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच ICDS च्या मोरे यांनी महिला व बाल विकास विभागाच्या योजनांची माहिती दिली. पोलिस यांनी स्त्री -purush समानता याविषयी मार्गदर्शन केले तसेच पुरुष मास्टर ट्रेनर, CRP v RGB सभासद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनतर चर्चा सत्राद्वारे शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन माहेर सीएमआरसी च्या व्यवस्थापिका वैष्णवी नाईक व आभार प्रदर्शन सहयोगीनी सोनल सावंत यांनी केले. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'