पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी 9 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा

सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जि.मा.का.) : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.8वी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती.या परीक्षाचा अंतरिम (तात्पुरता) निकाल शनिवार दि. 29 एप्रिल 2023 रोजी www.mscepune.in व https:// www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास शाळेच्या लॉगीनमध्ये दि. 9 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त शैलजा दराडे यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. 29 एप्रिल 2023 ते 9 मे 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. 50 या प्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटव्दारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडीलाचे नाव, आईचे नाव, शहरी, ग्रामीण अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दि. 9 मे 2023 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'