महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य जिल्हा दौऱ्यावर
सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ॲड. चंद्रलाल मेश्राम (निवृत्त न्यायमूर्ती), ॲड. बी.एल. सगर किल्लारीकर व लक्ष्मण हाके हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि.11 मे 2023 रोजी रात्री 8.30 वाजता ओरोस सिंधुदुर्ग येथे आगमन व मुक्काम. शुक्रवार दि. 12 मे 2023 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 11 वाजता आयोगाचा दौरा तसेच तिल्लोरे कुणबी समाज प्रतिनिधी व डोंगर कुणबी व तिल्लोरे कुणबी समाज प्रतिनिधीसोबत जनसुनावणीसंदर्भात जिल्हाधिकारी, आणि सहायक आयुक्त समाज कल्याण, यांच्यासोबत चर्चा. सकाळी 11 ते 1 वाजता तिल्लोरे कुणबी समाज प्रतिनिधींसोबत सुनावणी. डोंगर कुणबी व तिल्लोरे कुणबी समाज प्रतिनिधींसोबत जनसुनावणी, स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस. दुपारी 2 ते 5 वाजता श्रेत्र पाहणी सायं. 5 वाजता ओरोस हून चंदगड, जि.कोल्हापूरकडे रवाना.
0000
Comments
Post a Comment