चौकशी, प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी अर्ज सादर करावेत - जिल्हा उपनिबंधक माणिक भा. सांगळे

सिंधुदुर्गनगरी दि.12 (जि.मा.का): चौकशी, प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी सहकार खात्यातून निवृत्त झालेली अधिकारी (वय ची 70 वर्षे पूर्ण न झालेल्या), निवृत्त न्यायाधीश, वकील (सनद प्राप्त), चार्टर्ड अकाऊंटंट यांच्याकडून दि.10 जून पर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती, सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक माणिक भा. सांगळे यांनी दिली. अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड, व अधिनस्त सर्व तालुका उपनिबंधक, सहाय्यक निबंधक,सह. संस्था यांचे कार्यालयात दि. 10 जून 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्जासोबत पुढीलप्रमाणे कागदपत्रे जोडावीत- आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरवा, जन्मतारीख पुरावा, शैक्षणिक अर्हतेसंबंधी कागदपत्रे (पदवी प्रमाणपत्र), वकील असल्यास बार कौन्सिल सर्टिफिकेट जोडावे. अनुभवासंदर्भात आवश्यक कागदपत्रे इ. याबबातची जाहीर सूचना उपरोक्त नमुद कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'