सामाजिक समता पर्व जिल्हास्तरीय विविधस्पर्धेतील विजेत्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बक्षिस वितरण

सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जि.मा.का.) : सामाजिक समता पर्व जिल्हास्तरीय विविधस्पर्धेतील विजेत्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. सामाजिक समता पर्व निबंध स्पर्धा- शुभांगी लोहार, चेतन चव्हाण, प्राजक्ता जाधव, राहूल चव्हाण, वक्तृत्व स्पर्धा- योगिनी तिर्लोटकर, आर्यन कदम, दिप्ती जोशी, पियुष हिवाळे. रांगोळी स्पर्धा- राम बिबवणेकर, कुंदा कांबळे, श्रावणी मेस्त्री, मृदूला चव्हाण, भक्ती पालकर, अंजली जाधव या विजेत्या स्पर्धकांना पोलिस परेड मैदान येथे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. समाज कल्याण विभागात प्रभावीपणे राबविण्यात येणाऱ्या योजनांचे यशोगाथा या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त दि. 1 एप्रिल ते 1 मे या कालावधीत सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक समता पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी 7 वाजता सामाजिक न्याय भवन येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांच्या हस्ते समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा महाराष्ट्राचे राज्यगीताचे सामुहिक गायन करण्यात आले. सामाजिक समता पर्व कार्यक्रमाचा समारोप सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे उपायुक्त प्रमोद जाधव , समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे, सामाजिक कार्यकर्ते मठकर, अधिकारी व कर्मचारी,गृहपाल, विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच पालक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सोबत :- फोटो 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'