जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने 8 जून रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरी,दि.29 (जि.मा.का.) : खासगी क्षेत्रातील कारखाने, उद्योजग, व्यापार, उद्योजक, दुकाने, शॉप्स व इतर व्यवसाय यांना सद्यस्थितीत मनुष्यबळाचा तुटवडा भासत असल्याने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा प्लेसमेंट ड्राईव्ह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्श केंद्र सिंधुदुर्ग येथे गुरुवार दि. 8 जून रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केला आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी दिली. उद्योजकांना आवश्यक असलेल्या रिक्तपदांची माहिती त्यांच्या लॉगीनने ऑनलाईन पोस्ट करण्याची सुविधा कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर उपलब्ध आहे. ज्या उद्योग आस्थापनांनी या पोर्टलवर नोंदणी केलेली नाही. परंतु त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे, अशा उद्योजकांनी प्रथम वरील पोर्टलव्दारे आपली नोंदणी करून रिक्तपदे पोस्ट करावीत. जिल्हातील उद्योजकांनी पंडित दीनदयाळ रोजगार मेळाव्यामध्ये रिक्तपदे पुढीलप्रमाणे अधिसुचित केली आहेत. कारपेंटर, 25 जागा. शैक्षणिक अर्हता आय.टी.आय, वयोमर्यादा 18 ते 35, अनुभव किमान 1 वर्ष. असिंस्टंट कारपेंटर, 25 जागा, 10 वी पास, वयोमर्यादा, 18 ते 35, किमान 2 वर्ष तत्सम अनुभव सिव्हील इंजिनिअर ज्युनिअर 2 जागा, बीई सिव्हील, किमान 2 वर्ष तत्सम अनुभव, सिलेशनशिंप मॅनेजर, 12 जागा, पदवीधर आवश्यक वयोमर्यादा 18 ते 27 आहे. जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य आहे. नोकरी साधक (job seeker) उमेदवारांनी पोर्टलवर आपल्या स्वत:च्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन ॲप्लाय करावे. ॲप्लाय केलेल्या उमेदवारांची उद्योजक दि. 8 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग कार्यालयात मुलाखती घेवून नियोत्यांच्या अटी -शर्ती नुसार उमेदवारांची अंतिम निवड केले जाईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक उमेदवारांनी ‘शासन आपल्या दारी’ पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 02362-228835 ई-मेल आयडी -sindhudurgrojgar@gmail.com वर संपर्क साधावा. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'