जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 15 मे रोजी

सिंधुदुर्गनगरी दि.11 (जि.मा.का): माहे मे 2023 चा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि. 15 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 ते 1 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी प्रश्न मांडून त्यांचे हक्कांचे संरक्षण व्हावे व त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक होण्यासाठी महिला लोकशाही दिन हा एक उत्तम मार्ग आहे. अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उपलब्ध आहेत. अर्ज स्विकृतीचे निकष-अर्ज विहीत नमुन्यात असावा. तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असावे. तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा. पुढील विषयावरील अर्ज स्विकारले जाणार नाहीत,न्याय प्रविष्ठ प्रकरणे. विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज. सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर. राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान संधी, समान हक्क असा मुलभूत अधिकार दिलेला आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांचे तक्रारी, अडचणी त्यांचे शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'