राज्य क्रीडा पुरस्कारबाबत 22 मे पर्यंत आक्षेप व हरकती सादर कराव्यात

सिंधुदुर्गनगरी दि.17 (जि.मा.का): महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फतराज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडुंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाव्दारे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्तम क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडु), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडु) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शासन निर्णय क्र.शिछपु 2020/प्र.क्र.93/क्रीयुसे-2 दि.14 डिसेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार नियम क्र.4 अन्वये संचालनालयाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पुरस्कार या टॅबमध्ये (इंग्रजीकरिता Awards) राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीने शिफारस केलेल्या प्रस्तावित पुरस्कार्थींची यादी दि. 16 मे 2023 या कालावधीत प्रसिध्द करण्यात येत आहे . त्यानुसार याबाबत आक्षेप असल्यास संचालनालयाच्या desk14.dsys-mh@gov.in या ईमेल वर दि.16 ते 22 मे 2023 या कालावधीत आक्षेप/हरकती सादर करावयाच्या आहेत. त्यानुसार सदर पुरस्कार अनुषंगाने विहीत नमुन्यात हरकत/आक्षेप सादर करावे. असे क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे. विहीत नमुना http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन, डाउनलोड करुन घ्यावा. विहीत कालावधीत प्राप्त होणाऱ्या हरकत/आक्षेप यांचा विचार करण्यात येईल. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'