पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि. २७ (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. २9 व 30 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दिनांक 29 मे 2023 रोजी सकाळी 6.50 वा. गोवा (दाबोलिम) विमानतळ येथे आगमन व केसरी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. केसरी येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. केसरी येथून ओरोस कडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. ओरोस येथे आगमन व सिंधुदुर्ग भरडधान्य अभियान कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- नवीन जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 12.30 ते 1.00 वा. हळद लागवडी संदर्भातील नियोजबाबत बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 1.00 वा. ते 2.00 वा. राखीव. दुपारी 3.00 वा. मोदी @9 अभियानांतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्रातील उपक्रमासंदर्भात नियोजन बैठक (स्थळ- शासकीय विश्रामगृह, कणकवली). सायं. 5.00 वा. पत्रकार परिषद (स्थळ- शासकीय विश्रामगृह, कणवकली). सायं. 6 .00 वा. ते 8.00 वा. राखीव. रात्री 8.00 वा. कणकवली येथून केसरीकडे प्रयाण. रात्री 9.30 वा. केसरी येथे आगमन व राखीव. मंगळवार, दि. 30 मे 2023 रोजी सकाळी 7.00 वा. केसरी येथून झारापकडे प्रयाण. सकाळी 8.00 वा. झाराप येथे आगमन व झाराप येथून मुंबई-गोवा महामार्ग पाहणीस सुरुवात. सकाळी 8.00 वा. ते 9.00 वा. मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 10 झाराप ते कलमठ या 44 किमी ची पाहणी. सकाळी 9.00 ते 9.15 वा. मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 9 कलमठ ते कणकवली या 8 किमी ची पाहणी. सकाळी 9.15 वा. ते 10.00 वा. हॉटेल आशिष येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 वा. ते 10.30 वा. मुंबई-गोवा पॅकेज 9 कणकवली ते तळगाव या 31 किमी ची पाहणी. सकाळी 10.30 वा. ते 11.00 वा. मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 8 तळगाव ते वाकेड या 35 किमीची पाहणी. सकाळी 11.00 वा. ते 12.00 वा. मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 7 वाकेड ते कांटे या 51 किमी ची पाहणी. दुपारी 12.00 वा. ते 1.00 वा. मुबई-गोवा महामार्ग पॅकेज 6 कांटे ते आरवली या 40 किमी ची पाहणी. दुपारी 1.00 वा. ते 2.00 वा. मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 5 आरवली ते चिपळूण या 25 किमी ची पाहणी. दुपारी 2.00 वा. ते 3.30 वा. चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'