छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर मंगळवारी
सिंधुदुर्गनगरी,दि.22 (जि.मा.का.) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे उद्या मंगळवार दि. 23 मे रोजी रविंद्र मंगल कार्यालय, सालईवाडा, येथे सकाळी 9 वाजता शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
उपविभागीय अधिकारी (महसूल) उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अरुण उंडे, पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंके, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, नगरपालिका मुख्याधिकारी जयंत जावडेकर आदी प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. अशी माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी ए.एस.मोहोरे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहाय्यक आयुक्त ग.प्र.बिटोडे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य एन.डी.पिंडकुरवार यांनी दिली.
दहावी, बारावी नंतर करीअरच्या संधी, या विषयावर, गुरुकुल करियर ॲकेडमीचे बी.एस.जांभेकर हे मार्गदर्शक आहेत. व्यक्तीमत्व विकास या विषयवर, गुरुकुल करियर ॲकेडमीचे एस.जी. ढोणुकसे हे मार्गदर्शक आहेत. पालक व विद्यार्थी समुपदेशन या विषयावर फेलो, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे शिवानी गरड हे मार्गदर्शक आहेत. आय.टी.आय मधील प्रशिक्षण व शिकाऊ उमेदवारी विषय माहिती या विषयावर मू.प्रशि.तथा अनु.सूचना केंद्र सहा. प्रशि. सल्लागार यु.आर. कुलकर्णी हे मार्गदर्शक आहेत. मागसवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय शैक्षणिक योजना या विषयावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थाचे एस.बी. जाधव हे मार्गदर्शक आहेत. परदेशातील शिक्षण व नोकरी या विषयावर बिझनेस असोसिएट इंडो,जपान जर्मनी प्राजेक्ट चे सुमुपदेशक आशिष राडये, हे मार्गदर्शन करणार आहेत.
0000
Comments
Post a Comment