अथर्व फाऊंडेशन यांच्या मार्फत शहिद सैनिकांच्या मुलींना लॅपटॉपचे वाटप

सिंधुदुर्गनगरी,दि.22 (जि.मा.का) देशाभरातील शहिद जवानांच्या कुटुंबियांना तसेच माजी सैनिकांना वेगवेगळ्या माध्यमातुन मदत केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून अथर्व फाऊंडेशन, मुंबईचे चेअरमन सुनिल राणे यांच्या मार्फत शहिद सैनिकांच्या मुलींना लॅपटॉपचे वितरण करण्याचे गौरवास्पद काम करण्यात आले आहे. अथर्व फाऊंडेशन,चे स्वयंसेवक प्राध्यापक बालाजी शिंदे व प्राध्यापक संदिप झाडे यांच्याकडून १८ नोव्हेंबर २०२१ राजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे शहिद जवान रमेश महादेव गवस यांची कन्या श्वेता रमेश गवस, शहिद जवान सोमा शांताराम परब यांची कन्या सानिका सोमा परब व शहिद जवान हरि पाटकर यांची कन्या कोमल हरि पाटकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहिद जवानांच्या तीन मुलींना पुढील शिक्षणासाठी लॅपटॉप देऊन गौरविण्यात आले. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'