कणकवली प्रकल्पांतर्गत नडगिवे गावठण येथील अंगणवाडी मदतनीस पदांची भरती
सिंधुदुर्गनगरी दि.2 (जि.मा.का): एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय, कणकवली अंतर्गत ग्रामपंचायत नडगिवे गावठण येथील अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी मदतनीस पदांची भरती होणार आहे. या पदाकरिता मानधन रुपये 4 हजार 425 इतके असणार आहे. या महसुली गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून दिनांक 8 नोव्हेंबर 2021 ते 18 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कणकवली हे कळवितात.
0000
Comments
Post a Comment