भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी नवीन अर्ज व नुतनीकरण करण्याची मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी,दि.17(जि.मा.का) भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरील विजाभज इमाव व विशेष मागास प्रवर्गाचे सन २०२०-२१ करिता नवीन अर्ज नोंदणी करण्याची व अर्जांचे नुतनीकरण करण्याची मुदतवाढ मंगळवार ३० नोव्हेंबर २०२१ अखेर करण्यात आलेली आहे.अशी माहित दीपक घाटे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी दिली आहे.
ज्या विजाभज, इमाव व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज नोंदणी व अर्ज नुतनीकरण करण्याची ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
तसेच जिल्हयातील सर्व महाविद्यांलयानी महाविद्यालय स्तरावर प्रलबिंत असणारे अर्ज छाननी करुन ३० नोव्हेंबर २०२१ अखेर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करण्याचे आवाहन दीपक घाटे सहायक आयुक्त समाज कल्याण,सिंधुदुर्ग यांनी केलेले आहे.
00000
Comments
Post a Comment