आझादी का अमृत महोत्सव व विधी सेवा सप्ताह निमित्ता विविध स्पर्धांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.01 (जि.मा.का.) - आझादी का अमृत महोत्सव व विधी सेवा सप्ताह दिनांक 8 नोव्हेंबर 2021 ते 14 नोव्हेंबर 2021 च्या निमित्ताने विधी सेवा प्राधिकरणतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुढील स्पर्धांचा समावेश आहे. चित्रकला स्पर्धा, इयत्ता- 5 ते 8 वी वयोगट – 11 ते 15 वर्षे विषय- कोरोना / बालमजूरी /शिक्षणाचा अधिकार. निबंध स्पर्धा इयत्ता- 8 ते 10 वी वयोगट – 12 ते 16 वर्षे विषय- भारतीय राज्यघटना. घोषवाक्य लेखन स्पर्धा इयत्ता- 9 ते 12 वी वयोगट – 14 ते 18 वर्षे विषय- कोरोना / बालमजूरी /शिक्षणाचा अधिकार/बेटी बचाओ बेटी पढाओ. लघुपट स्पर्धा (Short duration films on awareness) इयत्ता- 9 ते 12 वी वयोगट – 15 ते 18 वर्षे विषय- लोकन्यायालय/मध्यस्थी. या स्पर्धा दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजी सुरु होवून दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी समाप्त होतील. तरी ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये भाग घ्यावयाचा आहे त्यांनी त्यांची चित्रे, निबंध, घोषवाक्ये, लघु चित्रपट हे दिनांक 8 नोव्हेंबर 2021 ते 11 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये secretarydlsasin289@gmail.com या ई-मेल वर पाठवावीत किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग व्दारा जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग-ओरोस यांचे कार्यालयात दिनांक 11 नोव्हेंबर 2021 पूर्वी पोहोचतील अशी पाठवावी, असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'