किसान क्रेडीट कार्ड योजनेसाठी कार्यशाळांचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी,दि.17(जि.मा.का) केंद्र शासनाच्या सुचनेनूसार किसान क्रेडीट कार्ड संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत दर शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यशाळांच्या यशस्वी आयोजनासाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांना तालुका नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आलेले अहे.
या योजनेंतर्गत ज्या पशुपालकांना पशुपालनासाठी व कुक्कुटलनासाठी अर्थसहाय्य हवे आहे, अशा पुशुपालकांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे. कार्यशाळेच्या ठिकाणासाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेंतर्गत पशुपालकांकडे सध्या उपलब्ध असलेल्या पशुधनाचा खर्च भागविण्यायसाठी पण या योजनेतून तरतुद करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेस बँक ऑफिसर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तरी इच्छुकांनी पशुधन विकास अधिकारी विस्तार यांचेशी संपर्क साधून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. आर.बी. दळवी, उपायुक्त पशुसंवर्धन अधिकारी यांनी केलेले आहे.
00000
Comments
Post a Comment