मत्स्यव्यवसायिक व मत्स्यकास्तकार यांनी किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेण्यासठी कॅम्पचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी,दि.17(जि.मा.का) जिल्ह्यातील जास्तीत जास्त मत्स्यव्यवसायिक व मत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळण्यासाठी दिनांक 8 नोव्हेंबर 2021 पासून तीन महिन्यासाठी प्रत्येक शुक्रवारी कॅम्पचे आयोजन करण्याच्या सुचना दिल्या आहेत.त्यानुषंगाने गुरुवार 18 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.वाजता खालील ठिकाणी किसान क्रेडिट कार्डचे ‍कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. आरोंदा मच्छीमार सहकारी संस्था, पिरवाडी, आरोंदा, ता. सावंतवाडी, रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्था, दांडी मालवण, र्वेगुर्ला मच्छीमार सहकारी संस्था,गिरपवाडा,ता. र्वेगुर्ला ,वाचनालय, तांबळडेग, ता. देवगड . तरी इच्छुक मच्छिमारांनी उपस्थित रहावे.अशी माहिती र.ग. मालवणकर सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग मालवण यांनी दिली आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'