10 वी व 12 परीक्षेच्या खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणी अर्जास नियमित शुल्काने मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का.): सन 2022 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षा व माध्यमिक शालन्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेस खासगीरित्या (फॉर्म नं. 17) प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. 17) ऑनलाईन प्रक्रियेव्दारे भरुन घेण्यात येणार असून त्यासाठी पुढील नमुद केलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावयाची आहे. 1. इ.10 वी व इ.12 वी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारणाच्या मुदतवाढीबाबतच्या तारखा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सोमवार दिनांक 22 नोव्हेंबर 2021 ते सोमवार दिनांक 06 डिसेंबर 2021 या कालावधीत विद्यार्थांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरणे. मंगळवार दिनांक 23 नोव्हेंबर 2021 ते मंगळवार दिनांक 7 डिसेंबर 2021 या कालावधीत विद्यार्थ्यांनी मुळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मुळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या सपंर्क क्रेंद्र शाळेत / कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करणे. शनिवार दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी संपर्क केंद्र शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची एक छायाप्रत मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे. माध्यममिक शालान्त व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव नोंदणीसाठी (प्रथम व व्दितीय मुदतवाढ यामधील) प्राप्त अर्जातील दुरुस्त्या दिनांक 11 नोव्हेंबर 2021 ते 21 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विभागीय मंडळामार्फत करण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित विद्यार्थ्यानी आपल्या शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. 2. शाळा सोडल्याचा दिनांक व दाखला दिल्याचा दिनांक याबाबत पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दिनांक ग्राह्य धरण्यात यावा. कोविड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इ.10 वी इ.12 वी सन 2021 चा निकाल जुलै-ऑगस्ट मध्ये लागलेला असल्याने, खाजगी विद्यार्थी ऑनलाईन नाव नोंदणीबाबत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाच्या दाखल्यावरील शाळा/कनिष्ठ महाविद्यालय सोडल्याची तारीख दिनांक 31 ऑगस्ट 2021 अशी ग्राह्य धरण्यात यावी. सदर बदल कोविड-19 मुळे फक्त सन 2022 च्या परीक्षेपुरताच लागू राहील. तथापि विद्यार्थ्यांच्या वयासाठी दिनांक 31 जुलै अशी तारीख राहील. 3. खाजगी विद्यार्थ्यांनी इ.10 वी इ.12 वी साठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. 4. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढील वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी / इंग्रजीमधून उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. इ.10 वी –https://form17.mh-sse.ac.in इ.12 वी https://form17.mh-hse.ac.in 5. विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता 1) शाळा सोडल्याचा दाखला (मुळ प्रत), नसल्यास व्दितीय प्रत व प्रतिज्ञापत्र 2) आधारकार्ड 3) स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. 6. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/ मोबाईलव्दारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य (compulsory) आहे. 7. संपुर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमुद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाणार आहे. तसेच या संपुर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. 8. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मुळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमुद केलेल्या संपर्क शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहे. 9. खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्काचा तपशिल पुढीलप्रमाणे इ.10 वी रु. 1 हजार नोंदणी शुल्क अधिक 100 रुपये प्रक्रिया शुल्क इ. 12 वी 500 रुपये नोंदणी शुल्क अधिक 100 रुपये प्रक्रिया शुल्क. 10. माध्यमिक शाळान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांस त्याच्या पत्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यमनिहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या सपंर्क केंद्राने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मुल्यमापन करावयाचे आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता, त्यांनी निवडलेली शाखा व माध्यमनिहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. त्या कनिष्ठ महाविद्यालयाव्दारे परीक्षा अर्ज, प्रकल्प प्रात्यक्षिक/ तोंडी, श्रेणी परीक्षा द्यावयाची आहे. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे. इ.10 वी 12 वी सन 2022 खाजगी विद्यार्थी फॉर्म नं.17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking) व्दारे भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. सदर पोचपावती स्वत:जवळ ठेवून त्याचा दोन छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात याव्यात. तसेच एकाच नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची (उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र, अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यांस पुन:श्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हावयाचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्च चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आश्वयकतेनुसार विभागीय मंडळ / कनिष्ठ महाविद्यालय/ संपर्क केंद्र यांचेकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक 020-25705207/25705208/25705271 वर सपंर्क साधावा. विद्यार्थ्याना नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मुळ कागदपत्रे संपर्क केंद्र /कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे (examanition form) मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. असे डॉ. अशोक भोसले सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी कळविले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'