जिल्ह्यात 5 लाख 40 हजार 176 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि.26(जि.मा.का.): जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 लाख 40 हजार 176 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 855 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 156 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 991 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 847 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 1 लाख 31 हजार 979 व्यक्तींनी पहिला डोस तर 88 हजार 259 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 55 हजार 704 नागरिकांनी पहिला डोस तर 1 लाख 20 हजार 11 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2 लाख 32 हजार 647 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 13 हजार 18 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 8 लाख 60 हजार 467 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 9 लाख 51 हजार 260 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 7 लाख 17 हजार 180 लसी या कोविशिल्डच्या तर 2 लाख 34 हजार 80 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 6 लाख 72 हजार 297 कोविशिल्ड आणि 1 लाख 88 हजार 170 कोवॅक्सिन असे मिळून 8 लाख 60 हजार 467 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 1 लाख 17 हजार 650 लसी उपलब्ध असून त्यापैकी 72 हजार 620 कोविशिल्डच्या आणि 45 हजार 30 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 19 हजार 160 लसी शिल्लक असून त्यापैकी 16 हजार 200 कोविशिल्ड आणि 2 हजार 960 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत. 000000 -- Regards :

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'