भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव सादर करावित

सिंधुदुर्गनगरी,दि.17(जि.मा.का) भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती फी योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, विजाभज इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी २४ नोव्हेंबर २०२१ पर्यत प्रस्ताव सादर करावित. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे. सन 2011-12 ने 2016-17 या कालावधीत तांत्रिक त्रुटी असल्यामुळे प्रलंबित असलेले अर्ज, सन 2017-18 मधील Mahaeschol या ऑनलाईन प्रणालीमध्ये नुतनीकरण केलेले मात्र देयक न निघाल्यामुळे प्रलंबित असणारे अर्ज सन 2017-18 मधील प्रथम वर्षास असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज ज्या महाविद्यालयांनी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयकडे अद्यापही सादर केलेले नाहीत अथवा सादर केलेले आहेत. परंतु एखादा विद्यार्थी राहून गेलेला आहे. अशा महाविद्यालयांनी प्रस्ताव या कार्यालयास 24 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर करावे.जिल्हयातील महाविद्यालयांना कार्यालयाकडून वारंवार झालेल्या बैठकीव्दारे Google Meet या ऑनलाईन प्रणालीवरुन होणाऱ्या बैठकामध्ये, कार्यालयांकडॅन वारंवार केलेला पत्रव्यवहार याव्दारे अर्ज सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. तरी सन 2011-12 ते सन 2017-18 या कालावधीतील प्रलंबित प्रस्ताव सादर करण्यासाठी ही अखेरची मुदत देण्यात येत आहे. महाविद्यालयाचे प्रस्ताव विहित वेळेत कार्यालयास सादर करावेत. प्रस्ताव सादर न केल्यास व या कालाधीतील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील, असे पत्रकात म्हटले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'