राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभासाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रे द्यावीत -तहसीलदार अमोल पाठक
सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का.): NER यादीस अनुसरुन अद्यापी ज्या शिधापत्रिकाधारकांनी दखल घेतलेली नाही त्यांनी याबाबत नोंद घेवून सदर लाभार्थी यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्याचा लाभ घेण्यास इच्छुक असल्यास अर्ज व आवश्यक कागदपत्रे धान्य दुकानदार यांचेमार्फत तहसिल कार्यालय, कुडाळ (पुरवठा शाखा) येथे लवकरात लवकर जमा करावीत जेणेकरुन पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल. असे आवाहन कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी केले आह.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पांतर्गत राज्यात AePDS प्रणालीद्वारे संगणकीकृत केलेल्या शिधापत्रिकांतील लाभार्थ्यांची बायोमेट्रीक ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप करण्यात येते सदर प्रणालीव्दारे माहे ऑगस्ट 2020 ते माहे डिसेंबर 2020 या 5 महिने कालावधीपर्यंत धान्य उचल न केलेल्या शिधापत्रिका RCMS प्रणालीमध्ये सदर शिधापत्रिका तात्पुरत्या स्वरुपात निलंबित करण्याच्या दृष्टिने शिधाजिन्नस अनुज्ञेय नाही या प्रकारात वर्ग करण्याबाबत शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले होते.
त्यानुसार सदर शिधापत्रिका RCMS प्रणालीमधील शिधाजिन्नस अनुज्ञेय नाही (Not Entitled for Ratiion Card (NER) या प्रकारात ऑनलाईन वर्ग करण्यात आलेल्या आहेत. सदर NER प्रकारामध्ये वर्ग करण्यात आलेल्या सदर शिधापत्रिकांच्या 12 अंकी नंबरच्या तपशिल धान्य दुकानदार यांना देण्यात आलेला होता. त्यानुसार सदर शिधापत्रिकांची खात्री करुन सदर शिधापत्रिकेतील लाभार्थी धान्य घेण्यास इच्छुक असल्यास, त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे स्वीकारुन त्यांचे कार्ड प्रकारानुसार योजनानिहाय 12 अंकी नंबर, कुटुंब प्रमुखाचे नांव, शिधापत्रिकेवरील एकूण सदस्य संख्या इ. तपशिलासह प्रकरणांची यादी तयार करुन या कार्यालयाकडे सादर करणेबाबत धान्य दुकानदार यांना कळविण्योत आलेले होते. त्यास अनुसरुन धान्य दुकानदार यांचेकडे प्राप्त झालेले अर्ज या कार्यालयाकडे धान्य दुकानदार यांनी सादर केलेले आहेत. प्राप्त अर्जास अनुसरुन त्यासोबत जोडण्यात आलेल्या कागदापत्रांनुसार खात्री करुन त्यांचे अनुज्ञेय प्रकारामध्ये सदर शिधापत्रिका ऑनलाईन वर्ग करण्याबाबतची कार्यवाही करण्यात आलेली आहे. तरी देखील बऱ्याच शिधापत्रिका अजूनही NER मध्ये ऑनलाईन दिसून येत आहेत. सदर NER शिधापत्रिकांच्या यादीची एक प्रत ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर, एक प्रत रास्त भाव धान्य दुकानाच्या ठिकाणी त्याचप्रमाणे एक प्रत तलाठी कार्यालयाचे सूचना फलकावर धान्य दुकानदार यांचेमार्फत प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
सदर प्रसिध्द केलेल्या NER या यादीस अनुसरुन दिनांक 15 ऑक्टोंबर 2021 पर्यंत पात्र लाभार्थी यांना विहीत अर्ज व कागदपत्र धान्य दुकानदार यांचेकडे मुदतीत आणून देण्याबाबत सूचित करण्यात आलेले होते. त्यानुसार तहसिल कार्यालयात प्राप्त झालेल्या अर्जास अनुसरुन उचित कार्यवाही करण्यात आलेली आहे. उर्वरीत NER शिधापत्रिकांच्या नोंदी ऑनलाईन रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.
00000
Comments
Post a Comment