पणजी येथे 50 वी डाक अदालत
सिंधुदुर्गनगरी,दि.29 (जि.मा.का) पोस्टमास्तर जनरल,गोवा क्षेत्र पणजी व्दारे दि. 21 डिसेंबर रोजी दुपारी 12 वा. पणजी येथे 50 वी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभागगाचे आ.ब. कोड्डा यांनी दिली आहे.
गोवा क्षेत्राशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल,स्पीड पोस्ट काऊटर सेवा, वस्तू,पार्सल, मनीऑर्डर, बचत खाते, याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इ.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार डाक अदालतीचे सेक्रेटरी रमेश प्रभू सहायक डाक निदेशक, पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा क्षेत्र पणजी 403001 यांच्या नावे दोन प्रतींसह दि. 10 डिसेंबर 2021 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.
00000
Comments
Post a Comment