जिल्हा कोषागार कार्यालयाच्या बहुउ्देशीय सभागृहाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जिमाका)- सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार कार्यालयाच्या बहुउ्देशीय सभागृहाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झाले. या उद्घाटन प्रसंगी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा कोषागार अधिकारी शिवप्रसाद खोत, अप्पर कोषागार अधिकारी यशवंत भोसले व कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार कार्यालयाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारलेल्या बहुउ्देशीय सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. जिल्हा कोषागार कार्यालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवृत्त वेतनधारक, तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण व बैठकांसाठी हे सभागृह प्रस्तावित केले होते. जिल्हा नियोजन समितीच्या सन 2018-19 च्या मंजूर निधीतून हे सभागृह उभारले आहे. *सोबत- फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'