कोविड 19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 14 बालकांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुदत ठेव प्रमाणपत्राचे वितरण

सिंधुदुर्गनगरी दि. 16 (जि.मा.का) : कोविड 19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 14 बालकांना 5 लक्ष मुदत ठेव प्रमाणपत्रांचे वितरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले. या प्रमाणपत्र वितरण प्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा उपस्थित होते. जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी सुरुवातीला याबाबत माहिती दिली. यावेळी बाल कल्याण समितीचे सदस्य ॲड. पी.डी. देसाई, स्नेहलता चोरगे, प्रतिभा नाटेकर, कौशल्य विकासचे सहायक आयुक्त एस.जी. पवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे नितीन काळे आदी उपस्थित होते. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'