कबड्डी खेळसाठी जिल्हास्तरीय खलो इंडियाचे प्रशिक्षण केंद्र

सिंधुदुर्गनगरी,दि.23 (जि.मा.का) क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत शुक्रवार २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता कबड्डी या खेळ प्रकाराचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रसाठी दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी निवड चाचणी आयोजित करण्यात आलेली होती या निवड चाचणीस खेळाडूंचा अल्प प्रतिसाद असल्याने पात्र खेळाडू प्राप्त न झाल्याने . पुनश्च दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ राजी सकाळी ९ वाजता खेला इंडिया प्रशिक्षण केंद्रासाठी कबड्डी खेळाडुंची निवडचाचणी आयोजित करण्यात आलेली आहे. सदरच्या निवड चाचणीस खेळाडूंसाठी वयोमर्यादा ८ ते १२ वर्षाखालील मुले, मुली ही आहे. खेळाडुंनी निवड चाचणीस येताना कबड्डी किट तसेच जन्म तारखेचा पुरावा आधारकार्ड, जन्मदाखला सोबत आणणे आवश्यक आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'