स्टेट बँकमध्ये माजी सैनिकांसाठी सुरक्षा रक्षक पदभरती

सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का): भारतीय स्टेट बँकेमध्ये माजी सैनिकांसाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली. भारतीय स्टेट बँकेमध्ये माजी सैनिकामधून सुरक्षा रक्षाकांची पदभरती करण्यात येणार आहे. त्यासाठी वयोमर्यादा- 1 ऑक्टोबर 2021 रोजी 45 वर्षापेक्षा कमी असावी, शैक्षणिक पत्राता- कमीत कमी 8 वी पास ते 15 वी पास नसावा. सैन्य दलातील 15 वर्षे सेवा झालेली असावी. हुद्दा- हॉव्ह ॲन्ड बीलो, चारित्र्य चांगले असावे, वैद्यकिय पात्रता सेफ-1 असावी. तरी इच्छिूक सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या उमेदवारांनी आपले डिस्चार्ज बुक, ओळखपत्र, इम्पलॉयमेंट कार्डसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सोमवार दि. 15 नोव्हेंबर 2021 रोजी प्रत्यक्ष भेटून आपले नाव नोंदणी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'