इतर मागासवर्गीय महामंडळाची एकरकमी परतावा योजन

ा सिंधुदुर्गनगरी,दि.17(जि.मा.का) जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय महामंडळाच्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थीसाठी एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनूसार थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेवर 2 टक्के सुट देण्यात येईल ही योजना ठराविक कालावधीसाठी आहे. खाते बंद केल्यावर महामंडळाच्या नवीन रु. 10.00 लक्ष व्याज परतावा योजनेतंर्गत लाभ घेता येईल. संबधितांनी योजनेचा लाभ घेऊन थकीत कर्जाची परतफेड करावी व आपले कर्ज खाते बंद करावे . योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थीनी घ्यावा असे आवाहन प्रिती आर पटेल जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. ही योजना महामंडळाच्या थेट कर्ज योजनेस लागू राहणार नाही याची नोंद घ्यावी, अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग येथे 02362 2228119 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'