सिंधुदुर्गनगरी मध्ये डाक अदालत

सिंधुदुर्गनगरी,दि.29 (जि.मा.का) दिनांक 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग यांचे कार्यालयामध्ये डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभागाचे आ.ब. कोड्डा यांनी दिली आहे. पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल,स्पीड पोस्ट काऊटर सेवा, डाक वस्तू,पार्सल, मनीऑर्डर, बचत खाते, याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इ. संबंधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर आ.ब. कोड्डा सिंधुदुर्गनगरी 416812 यांचे नावे दिनांक 6 डिसेंबर 2021 पर्यंत अथवा त्यापुर्वी पोहाचेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही . 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'