शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय योजनेचा लाभा घ्यावा
सिंधुदुर्गनगरी,दि.18 (जि.मा.का) शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग यांचे मार्फत इतर मागास घटकांसाठी महामंडळाकडून २० टक्के बीज भांडवल, १० लाख रुपये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा व १ लाख रुपये पर्यंतची थेट कर्ज योजना राबविल्या जात आहेत.
योजनाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. बीज भांडवल कर्ज योजना - योजनेत कर्जाची मर्यादा ही ५लाख रुपये असून कर्जाची मुदत ५ वर्षे आहे. योजनेमध्ये महामंडळाचा सहभाग २० टक्के बँकेचा सहभाग ७५ टक्के व लाभार्थी सहभाग हा ५ टक्के असतो. महामंडळाच्या कर्ज रकमेवर द.सा.द.शे ६ टक्के व्याज आकारले जाते व बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेच्या नियमानुसार आकारले जाते. लाभार्थीच वय १८ ते ५० वर्षे असणे आवश्यक आहे.या योजनेचे अर्ज जिल्हा कार्यालय येथे उपलब्ध आहेत.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना - या योजनेत कर्जाची मार्यादा १० लाख रुपये असून ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास १२ टक्के पर्यंतचा व्याज परतावा लाभार्थींच्या बचत खात्यात दरमहा जमा करण्यात येणार आहे. याकरिता लाभार्थीचे वय १८ ते ५० वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे. योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने महामंडळाच्या www.msobcfdc.org वेबसाईटवर व्याजपरतावा मध्ये नावनोंदणी करुन सादर करावयाचे आहेत.
गट कर्ज व्याज परतावा योजना - या योजनेची मर्यादा ५० लाख रुपये पर्यंतची असून गटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास १२ टक्के पर्यंतचा व्याज परतावाची रक्कम लाभार्थीच्या बचत खात्यात जमा करण्यात येणार आहे. योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने महामंडळाच्या www.msobcfdc.org वेबवासाईट वर व्याजपरतावा मध्ये नावनोंदणी करुन सादर करावयाचे आहे.
थेट कर्ज योजना - या योजनेत कर्जाची मर्यादा १ लाख रुपये असून मुदत ४वर्षे आहे. महामंडळाकडून ही योजना बिनव्याजी असून मुदतीत कर्ज न भरल्यास द.सा.द.शे ४ टक्के व्याजदर आकारण्यात येतो. या योजनेकरिता वार्षिक उत्पन्नाची अट १ लाख रुपये आहे. तसेच अर्जदाराचा सिबील स्कोर कमीत कमी ५०० असणे आवश्यक आहे. या योजनेकरिता लाभार्थीचे वय १८ जे ५५ पर्यंत असणे आवश्यक आहे. कर्ज योजनेचे अर्ज जिल्हा कार्यालयमध्ये उपलब्ध आहेत.
ज्या गरजू उमेदवारांना इतर मागास महामंडळाच्या वरील योजनांमध्ये सहभाग घेवून अपला नवीन व्यवसाय किंवा चालू असणारा व्यवसांयामध्ये वाढ करण्याकरिता आपण शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्ग ०२३६२ २२८११९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. अशी माहिती, प्रिती आर पटेल जिल्हा व्यवस्थापक यांनी दिली आहे.
00000
Comments
Post a Comment