जिजाई वस्तीस्तर संघाच्यावतीने गवंडीवाडा येथे आरोग्य तपासणी

सिंधुदुर्गनगरी दि.25 (जि.मा.का): महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापीत सिंधुकन्या लोक संचलित साधन केंद्र, नगर परिषद मालवण, दिनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविक अभियानअंतर्गत जिजाई वस्तीस्तर संघाच्यावतीने गवंडीवाडा येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात 38 जणांनी लाभ घेतला. जिल्हा समन्वयक नितीन काळे, जिजाई वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष माधवी तिरोडकर, नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक, सिंधुकन्या सीएमआरसीच्या व्यवस्थापक गिता चौकेकर यांच्या उपस्थितीत शिबीराला सुरुवात झाली. सुरुवातीला राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. क्षेत्रीय समन्वयक खेमराज सावंत, संकल्प शहरस्तर संघाचे सदस्य स्नेहा मयेकर, दतात्रय मयेकर, हिंदू लॅब फ्लेबोटॉमिस्ट पूजा चव्हाण, तालुका रुग्णालयाचे समुपदेशक उमेश पेडणेकर हे उपस्थित होते. या शिबीरात रक्तामधील साखर, लोह, कोलेस्ट्रॉल, थॉयरॉईड, लिवर, कीडनी, रक्तदाब तसेच रॅन्डम साखर तपासणी करण्यात आली. शिबीर यशस्वी होण्यासाठी बचत गटातील निशा कांबळी, जागृती गोन्साल्वीस, रेखा पवार, ज्योतिका परुळेकर, विजया माळगावकर, आरती कोडचवाडकर आणि बचतगटातील महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'