जिल्हा प्रशासनाच्यावतीने "एमपीएससी" साठी उद्या फेसबुक लाईव्ह मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) – एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परीक्षेच्या स्वरुपापासून विविध शंकांचे निरसन यात होणार आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या या संकल्पनेतून सुरू झालेल्या प्रेरणा उपक्रमाअंतर्गत उद्या दुसरे ऑनलाईन मार्गदर्शन सत्र होत आहे. मंगळवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत हे मार्गदर्शन फेसबुक लाईव्हद्वारे https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-01061044850492 ऑनलाईन होत आहे. उद्या होणाऱ्या या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, परीविक्षाधिन उपजिल्हाधिकारी तथा देवगडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, परीविक्षाधिन तहसीलदार तथा परीचलन अधिकारी सहभागी होणार आहेत. एमपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी, आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे, येणाऱ्या अडचणींवर मार्ग कसा काढावा, या बरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्न, शंका यांचे निरसन केले जाणार आहे. यापूर्वी युपीएससी विषयी मार्गदर्शन सत्र संपन्न झाले आहे. त्यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी एमपीएससीसाठीही अशा स्वरुपाचे सत्र आयोजित करण्याविषयी विचारणा केली होती. त्याअनुषंगाने उद्या एमपीएससी परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून, विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी याचा लाभ घ्यावा. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'