महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित पूर्व परीक्षा 2020,4 सप्टेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी, दि.24 (जि.मा.का.) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित पूर्व परीक्षा -2020 शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या वेळेत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा कणकवली कॉलेज कणकवली (जुनी इमारत). कणकवली कॉलेज कणकवली (नवी इमारत). एस.एम. हायस्कूल, कणकवली. विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली, कणकवली या उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेस येताना विद्यार्थ्यांनी पुढील साहित्या सोबत आणावे. काळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन, पेन्सिल व आयोगाने परवानगी दिलेले साहित्या, प्रवेश पत्र आणणे अनिवार्य आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स या पैकी किमान एक मूळ ओळखपत्र व त्याची झेरॉक्स प्रत सोबत आणावी. तसेच विद्यार्थीनी पुढील साहित्या सोबत आणू नये. याची दक्षता घ्यावी स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लू टूथ, दूरसंचार साधन म्हणून वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वह्या, नोट्स, परवानगी नसलेली पुस्तके, बॅग्ज, पॅड, पाऊच, परिगणक इत्यादी प्रकारचे साहित्य, साधने परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास व बाळगण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेच्या किमान एक तास आधी उपस्थित रहावे. परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटरच्या परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी, फॉक्स केंद्र, ध्वनीक्षेपक सकाळी 8.00 ते दुपारी 1 .00 या वेळेत बंद ठेवण्याबाब तसेच परीक्षेच्या उपकेंद्रावर व आवारात कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश न देण्याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये कार्यकारी दंडाधिकारी, कणकवली यांच्या मार्फत मनाई आदेश लागू करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे या कळवितात. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'