जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठ
ा
जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 1 हजार 240 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 356.7880 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.75 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत.
देवघर - 76.1730, अरुणा - 78.1636, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 1.8480, ओटाव – 2.2384, देंदोनवाडी – 0.5455, तरंदळे – 2.5020, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.4060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2210, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 1.5910, हरकूळ – 2.380, ओसरगाव – 1.3390, ओझरम – 1.8190 पोईप – 0.732, शिरगाव – 1.382, तिथवली – 1.723, लोरे – 2.696 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment