पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) - महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व इतर जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरामुळे खुप मोठी जिवीतहानी व नुकसान झालेले आहे. कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. महापुरामुळे, दरड कोसळल्यामुळे व लॉकडाऊनमुळे महाराष्टात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, गरीब व कष्टकरी, मजूंर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यससाठी, त्यांना जीवनावश्यक वस्तु अन्नधान्य , औषधोपचाराची इ. मदत करण्याची आणि मा. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आर्थिक स्वरुपात मदत करण्याची आवश्यकता आहे. या जिल्ह्यामधील नोंदणीकृत न्यासांना आवाहन अरण्यात येते की, आपण सढळहस्ते गरजुंना आर्थिक व वस्तुरुपाने मदत करावी . असे आवाहन एम.एस.निकम सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'