जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी स्किल कॉम्पिटीशन स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) – जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 48 क्षेत्रातील जिल्हा, राज्य स्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कौन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने स्किल कॉम्पिटीशन आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करण्यात येणार आहे. या स्पर्धांमधून निवड केलेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावरील कौशल्य स्पर्धांचे आयोजन 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2021 दरम्यान औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक महाविद्यालयांच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी 15 ऑगस्ट 2021 पर्यंत https://kaushalya.mahaswayam.gov.in ला भेट देऊन नोंदणी करावी. नोंदणी करण्यास अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग दूरध्वनी क्र. 02362-228835, मोबाईल - 7507968454/9403350689, ई-मेल - sindhudurgrojgar@gmail.com वर संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'