ऑलम्पिक पदक विजेत्यांना ई- पोस्ट व्दारे शुभेच्छा
सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) - नुकत्याच टोकियो येथे पार सपडलेल्या 2020 ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भारताने एक सुवर्ण पदक, दोन रौप्य पदक व चार कांस्य पदक असे एकूण सात पदके पटकावली आहेत.ही आपल्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे. त्यासाठी जास्तीत जास्त शुभेच्छा पोहोचविण्यासाठी भारतीय डाक विभागात ई. पोस्ट सेवा उपलब्ध आहे.
ऑलम्पिक स्पर्धेतील पदक विजेत्यांना अभिनंदनपर घरपोच शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट आफिसमध्ये ई-पोस्ट सेवा उपलब्ध आहे. ई-पोस्ट व्दारे आनलाइन शुभेच्छा पाठविल्या जातात. ऑलम्पिक पदक विजेत्या खेळाडूंना घरपोच छापील संदेश फक्त 10 रुपयात पाठविण्यासाठी नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा. शुभेच्छा तात्काळ संबंधित विजेत्याला पोच केला जाईल. ऑलम्पिक पदक विजेत्यांचे नाव व पत्ता सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. असे आवाहन अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment