जिल्हा प्रशासनाच्यावतीने "यूपीएससी" साठी उद्या फेसबुक लाईव्ह मार्गदर्शन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, सीईओ प्रजीत नायर आणि संजिता महोपात्रा यांचा सहभाग

सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) – यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परीक्षेच्या स्वरुपापासून विविध शंकांचे निरसन यात होणार आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या या संकल्पनेची सुरुवात उद्यापासून होत आहे. बुधवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत हे मार्गदर्शन फेसबुक लाईव्हद्वारे https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-101061044850492 ऑनलाईन होत आहे. प्रथमच अशा अभिनव उपक्रमाची सुरुवात होत असून, उद्या होणाऱ्या या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आणि सहायक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा सहभागी होणार आहेत. यूपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी, आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे, येणाऱ्या अडचणींवर मार्ग कसा काढावा, या बरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्न, शंका यांचे निरसन केले जाणार आहे. या उपक्रमात यापुढेही जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांना सहभागी करुन एमपीएससी परीक्षेबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार असून, विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी याचा लाभ घ्यावा. 0000

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'