वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 33 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 33 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 20.125 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3185.3575 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 27 (3131), सावंतवाडी - 23(3454.1), वेंगुर्ला - 18 (2511.8) कुडाळ - 08 (3049), मालवण - 16(3372.96), कणकवली - 31 (3576), देवगड - 05(2711), वैभववाडी - 33 (3677) पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment