वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 10 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 3.5 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3119.1075 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. सावंतवाडी - 06(3393.1), कुडाळ - 04 (2996), मालवण - 05(3316.96), कणकवली - 01 (3440), देवगड - 02(2705), वैभववाडी - 10 (3590) पाऊस झाला आहे. तर वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील पावसाची आकडेवारी निरंक आहे.
00000
Comments
Post a Comment