रक्षाबंधनानिमित्त विशेष लिफाफ्या
सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) - भारतात दरवर्षी रक्षाबंधन हा सण मोठया उत्साहाने साजरा केला जातो रक्षाबंधन म्हणजे बहिण - भावाच्या बंधन या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रमाने जिंकून घेते. या वर्षी रक्षाबंधन हे 22 ऑगस्ट 2021 रोजी असून पोस्टल विभागातर्फे राखी पाठविण्यासाठी विशेष लिफाफे तयार करण्यात आले आहेत. हे लिफाफे रंगीत, वॉटरप्रुफ असून आपल्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत. या लिफाफ्यामधून स्पीड पोस्ट व्दारे राखी व भेट वस्तू पाठवता येवू शकते स्पीड पोस्ट व्दारे राखी किंवा भेट वस्तू या जलद व सुरक्षित पोहचवली जाते.
विशेष लिफाफे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असून एका लिफाफ्याची किंमत प्रत्येकी रुपये 10 आहे. अशी अवाहन अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment