जिल्ह्यात 2 लाख 91 हजार 278 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) - जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 91 हजार 278 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 832 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 440 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 905 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 233 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 93 हजार 611 व्यक्तींनी पहिला डोस तर 44 हजार 849 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 96 हजार 159 नागरिकांनी पहिला डोस तर 37 हजार 171 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 81 हजार 771 जणांनी पहिला डोस तर 11 हजार 490 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 3 लाख 98 हजार 461 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 3 लाख 72 हजार 700 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 2 लाख 62 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 10 हजार 220 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 2 लाख 85 हजार 543 कोविशिल्ड आणि 1 लाख 12 हजार 918 कोवॅक्सिन असे मिळून 3 लाख 98 हजार 461 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 0 लसी उपलब्ध असून त्यापैकी 0 कोविशिल्डच्या आणि 0 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 300 लसी शिल्लक असून त्यापैकी 300 कोविशिल्ड आणि 0 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'