देवगड तालुक्यात सर्वाधिक 40 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 23.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2918.1875 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग -22 (2861), सावंतवाडी -18 (3188.1), वेंगुर्ला -38.6 (2363.4), कुडाळ -18(2776), मालवण -25 (3125), कणकवली -12 (3209), देवगड -40 (2569), वैभववाडी -17 (3254) असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment