स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) 12: स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिना निमित्त 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9 वाजून 5मिनीटांनी पोलिस परेड ग्राऊंड, जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास के.मंजुलक्ष्मी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर मान्यवर, अधिकारी /कर्मचारी उपस्थित राहणार आहे. सकाळी 9.05 वाजता मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम, सकाळी 9.05. ते 9.15 वा. पर्यंत पोलिस दल, राज्य राखीव दल व होमगार्ड यांची संयुक्त मानवंदना असा कार्यक्रम होणार आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'