जिल्ह्यात 3 लाख 16 हजार 792 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) - जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 16 हजार 792 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 834 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 637 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 910 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 114 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 97 हजार 080 व्यक्तींनी पहिला डोस तर 56 हजार 062 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 3 हजार 011 नागरिकांनी पहिला डोस तर 53 हजार 164 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 96 हजार 957 जणांनी पहिला डोस तर 13 हजार 323 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 4 लाख 54 हजार 092 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 4 लाख 31 हजार 600 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 3 लाख 84 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 23 हजार 120 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 3 लाख 33 हजार 169 कोविशिल्ड आणि 1 लाख 20 हजार 923 कोवॅक्सिन असे मिळून 4 लाख 54 हजार 092 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 7 हजार 140 लसी उपलब्ध असून त्यापैकी 2 हजार 250 कोविशिल्डच्या आणि 4 हजार 890 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 130 लसी शिल्लक असून त्यापैकी 60 कोविशिल्ड आणि 70 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'